दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : इंदापूर येथील काँग्रेस भवनची जागा ही कोणाच्याही खाजगी मालकीची नसून ती जागा इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर या नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीची असल्याचे स्पष्टीकरण ट्रस्टचे विश्वस्त मेघ:शाम पाटील यांनी दिले. (‘That’ property belongs to Indapur Taluka Charitable Trust – MeghSham Patil)
ही जागा कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकीची नाही
ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळी इंदापूर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला, तालुक्याच्या ठिकाणी बसण्या-उठण्याची सोय व्हावी म्हणून शहरात मध्यवर्ती ठिकाण कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ ) यांनी लोकवर्गणीतून सदर जागा घेऊन तेथे इमारत बांधली. (Indapur News ) सदर जागा ही काँग्रेस हे नाव असलेल्या देशातील अथवा राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकीची केव्हाही नव्हती व नाही. सदर जागेचा कोणत्याही नोदणीकृत राजकीय पक्षाचा काही एक हक्क हितसंबंध नाही. कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) हे त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे नेते असल्याने ही इमारत कालांतराने काँग्रेस भवन या नावाने ओळखली जाऊ लागली. त्या जागेशी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही.
धर्मादाय आयुक्त यांचे आदेशानुसार इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांचा नावाची नोंद सरकार दप्तरी झालेली आहे. ह्या सर्व नोंदी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झालेल्या आहेत. (Indapur News ) इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट या जागेचा व इमारतीचा नगरपालिका कर, पाणीपट्टी, लाईट बिल आदी सर्व प्रकारचे वर्षानुवर्षे जमा करीत आहे. परंतु यामध्ये काही लोक चुकीच्या पद्धतीने जनतेची दिशाभूल करून गैरसमज निर्माण करत असल्याचेही विश्वस्त मेघ:शाम पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : भिमाई आश्रमशाळेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
Indapur News : इंदापूर महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल ९१ टक्के; तर, कला शाखेचा निकाल ७० टक्के