Indapur News इंदापूर : राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून इंदापूर तालुक्यातील विकासकामांना भरघोस निधी मिळत आहे. (Indapur News) आगामी काळातही जास्तीचा निधी मिळणार असल्याने विकासकामांचा ओघ सुरूच राहणार आहे. इंदापूर तालुक्याच्या चौफेर विकासासाठी शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याची ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. (Indapur News)
हिंगणगाव, शेटफळ हवेली, वकीलवस्ती, तक्रारवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या 4 गावांमध्ये 9 कोटी 14 लाख रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमास गावोगावी जनतेचा व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमाला अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेली विकासकामे पुढीलप्रमाणे :
1) हिंगणगाव (एकूण – 27 लाख रुपये) – जुने गावठाण ते दत्त मंदिर रस्ता – 15 लाख, दत्त मंदिर येथे नवीन गावठाण रस्ता – 12 लाख.
2) शेटफळ हवेली (एकूण – 14 लाख) – गारपीर ते सावंत वस्ती रस्ता – 7 लाख, गारपीर ते कानगुडे वस्ती रस्ता – 7 लाख.
3) वकीलवस्ती (एकूण – 5.25 कोटी) – ग्रामपंचायत कार्यालय बांधणे – 20 लाख, आनंद दूध डेअरी ते खंदारे वस्ती रस्ता – 7 लाख, हनुमान नगर अंतर्गत रस्ते करणे – 8 लाख, अधिवेशन मार्च 23 अर्थसंकल्पातून वकीलवस्ती – भांडगाव रस्ता – 90 लाख, पावसाळी अधिवेशन जुलै 23 मधून वकीलवस्ती – भांडगाव रस्ता – रु. 4 कोटी.
4) तक्रारवाडी (एकूण – 3.47 कोटी) – तक्रारवाडी ते गाडेश्वर मंदिर रस्ता – 1.20 कोटी, तक्रारवाडी राष्ट्रीय पेयजल योजना – 1.30 कोटी, भिगवण-राशीन रोड ते पाणी शुद्धीकरण केंद्र रस्ता – 65 लाख, संपत वाघ घर ते राहुल सावंत घर रस्ता – 7 लाख, संपत वाघ घर ते जगदाळे घर रस्ता – 10 लाख.
कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे हिंगणगाव, शेटफळ हवेली, वकीलवस्ती, तक्रारवाडी येथे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. गावोगावच्या कार्यक्रमांना कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तक्रारवाडी येथील कार्यक्रमास महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली.