(Indapur News )पुणे : इंदापूर तालुक्यातील कामांच्या श्रेय वादाची लढाई घेण्यावरुन आजी माजी आमदारांमध्ये चांगली जुंपली आहे. त्यामुळे सातत्याने इंदापूर तालुक्यातील राजकारणात चर्चा रंगलेली असते. आता सुमारे २६ किमी रस्त्यांसाठी तब्बल १९.४१ कोटी मंजूर झाले आहेत. मात्र,या मंजुरीनंतर विरोधकांनी नेहमीप्रमाणे फुकटचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड सूरू केली आहे. सध्या हर्षवर्धन पाटलांची ‘सुंभ जळाला तरी पीळ कायम’ या म्हणी सारखी अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांवर केली आहे.
आमदार भरणे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात ही जहरी टीका…!
भरणे म्हणाले, त्यांना नाकर्तेपणामुळेच जनतेने घरी बसविले आहे. मात्र अधिकार नसताना सुद्धा ते सारखे कशातही लुडबुड करून चमकोगिरी करत असल्याचे सांगत भरणे म्हणाले की, खरे तर सध्या त्यांचा विश्रांतीचा काळ आहे. त्यामुळे तालुक्याचा आमदार म्हणून मी जो विकासनिधी खेचून आणत आहे, तो त्यांनी पाहत बसावा. त्यांना निधी मंजूर करण्याचा कसला अधिकार नाही, अशी रिकामटेकडी मंडळी मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून राजकीज पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका भरणे यांनी केली आहे.
‘ए तो ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी है’असे सांगत येणाऱ्या काळात यापेक्षा मोठा निधी आपल्याला प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विरोधकांनी स्वत:चे साखर कारखाने नीट चालवून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसबिले देण्यासाठी लक्ष द्यावेत ,असाही टोला शेवटी पाटील यांना लगावला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigvan News : तक्रारवाडीच्या पिरसाहेब ऊरुस उद्या (सोमवार) पासून!