(Nitin Gadkari) पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ठरलेल्या कार्यक्रमांना भेटी दिल्या.
दरम्यान, गडकरी यांनी मागे एकदा पुण्यातील एका कार्यक्रमात,”पुणेकर नागरिकांना लवकरच हवेतील बसने प्रवास करता येणार” अशी घोषणा केली होती. त्यानंतर या घोषणेची अनेकांनी खिल्ली उडवली होती. तोच धागा पकडत पुण्यातील पत्रकारांनी गडकरी यांना उडत्या बसबाबत विचारले असता, ”मी घोषणा करणार्यांपैकी नाही.” असे म्हणत कोणती घोषणा केली आणि ती पूर्ण केली नाही ते सांगा, असा प्रति प्रश्न उपस्थित केला.
तसेच हवेतील बससाठी पुणे महापालिकेने डीपीआर द्यावा. पुणे महापालिकेमार्फत डीपीआर आल्यावर मंजुरी देण्यास तयार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली. गडकरी यांनी उत्तर दिल्याने आता पुन्हा पुण्यातील उडत्या बसचा मुद्दा चर्चेला आला आहे. पुणेकरांना खरंच हवेत उडणाऱ्या बसने बस प्रवास घडवायचा असेल तर महापालिकेनेच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sharad Pawar : गळ्यात कांद्याच्या माळा घालणारे भाजपवाले कुठे गेले ?? शरद पवारांचा सवाल