राजेंद्र कुमार शेळके
(Hadapsar News) हडपसर, (पुणे) : जुन्नर तालुक्यातील धोलवड येथील स्तंभलेखक संजय नलावडे यांना आदर्श साहित्य सेवारत्न पुरस्कार व नळवणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांना स्वप्नल फौंडेशनचा आदर्श सरपंच पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे.
पुरस्कार प्रदान सोहळा…!
पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी (ता. १७) होणार आहे. जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या आणि काळाच्या पडद्याआड किंवा विस्मरणात गेलेल्या अनेक गुणीजणांची दुर्मिळ माहितीसह संशोधनात्मक पद्धतीने नवीन पिढीला ‘निसर्गरम्य जुन्नर – भूमी गुणीजणांची’ या लेखमालेतून ओळख करून देण्याच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी स्तंभलेखक संजय नलावडे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नळवणे गावात पंचायत समिती, जिल्हा परिषद, वन विभाग, आरोग्य विभाग, यांच्यामार्फत अनेक सामाजिक योजना, महिला सबलीकरण आणि मूलभूत सुविधांसाठी अर्चना उबाळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, धोलवड येथील विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.