(H3N2 virus) पिंपरी : राज्यात H3N2 च्या विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे. या विषाणूने पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये पाहिला बळी घेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याची दखल घेत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मुंबईहून तातडीने पिंपरी-चिंचवडकडे रवाना झाले आहेत.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याची बैठक नियोजित केली असून, संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहेत. वास्तविक, मुंबईत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्त आमदार लांडगे मुंबईत आहेत. शहरातील विविध प्रश्नांसदर्भात पाठपुरावा सुरू आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये H3N2 चा पहिला बळी गेला आहे. ७३ वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला. हे वृत्त समजल्यानंतर आमदार लांडगे तातडीने शहरात येण्यासाठी रवाना झाले आहेत. महापालिका आरोग्य, वैद्यकीय विभाग आणि रुग्णालय प्रमुखांसह संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये शहरातील H3N2 चा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन…
गेल्या काही दिवसांपासून एका वृद्ध व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संबंधित रुग्णाला सर्दी, खोकल्याची लक्षणं असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पिंपरी-चिंचवड ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या शून्य रुग्ण आहे अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. मात्र, तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
अश्विनीताईंच्या पाठिशी उभे राहाण्याची हिच ती वेळ : आमदार महेश लांडगे यांचे आवाहन