gram panchayat election 2023 : अक्षय भोरडे / तळेगाव ढमढेरे : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता विजय करपे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंचपदाची जागा रिक्त झाली होती. रिक्त जागेसाठी म्हसोबा ग्राम विकास पॅनलचे प्रमुख पंचायत समिती सदस्य विजय सोमनाथ रणसिंग, मनसेचे शिरूर तालुका अध्यक्ष तेजस यादव, माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब काळे यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला. सरपंच पदासाठी बापूसाहेब काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास फुके यांनी काम पाहिले. बापुसाहेब काळे यांच्या निवडीवेळी ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंच सविता विजय करपे, उपसरपंच अश्विनी एकनाथ लांडगे, तनुजा विधाटे, कविता चौधरी, कविता रणसिंग, ग्रामपंचायत सदस्या ज्योती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सचिन चव्हाण, प्रदीप पवार, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, गाव कामगार तलाठी शांताराम सातपुते, निमगावचे पोलीस पाटील किरण काळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष करपे, भारत सरकार नोटरी ॲड. रावसाहेब करपे, माजी सरपंच रावसाहेब चव्हाण, भरत विधाटे, डॉ. रमेश चौधरी, अजित चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी अपेक्षा टाकळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडीनंतर जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे, मन की बात पुणे जिल्हा सहसंयोजक शरद रासकर या मान्यवरांनी उपस्थित राहून काळे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे बापूसाहेब काळे यांनी सांगितले.