पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर पोलीस ठाण्याला जनहित सोशल फाउंडेशनच्या वतीने दोन संगणक आज शनिवारी (ता.३) भेट स्वरुपात देण्यात आले आहे.
जनहित सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई व हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांना देण्यात आले आहे. यावेळी, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य स्वप्निल उंद्रे, कदमवाकवस्ती भाजपाचे शहराध्यक्ष विशाल गुजर, किसन बेळगावकर, आकाश उंद्रे आणि हडपसर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष. सलग पाचवेळा आमदार, राज्यात कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान खासदार अशी राजकीय यशाची चढती कमान असलेले खासदार गिरीश बापट यांचा आज ७० वा वाढदिवस आहे.
भारतीय जनता पार्टीच्या पुण्याच्या इतिहास खासदार बापट यांना इतका प्रदीर्घ काळ इतर कुणालाही राजकीय पदे लाभली नाहीत. पुणे महापालिकेतदेखील त्यांनी सलगपणे काम केले आहे. पुण्यातून कसबा मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
याबाबत बोलताना प्रवीण काळभोर म्हणाले कि, खासदार गिरीश बापट हे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी पुण्याच्या विकासासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांची समाजोपयोगी मदत व्हावी. यामधून सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा. या हेतूने खासदार बापट यांच्या वाढदिवसानिमित्ताने हडपसर पोलीस ठाण्याला दोन संगणक भेट देण्यात आले.