लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्तीच्या कार्यक्षम सरपंच गौरी गायकवाड यांनी मागील साडेचार वर्षात नागरिकांसाठी सरकारी योजना मोठ्या प्रमाणात राबविल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. त्यामुळे येणारा भविष्यकाळ हा उत्तम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले आहे.
कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर व ई श्रम कार्डचे वाटप या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदीप कंद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कंद बोलत होते.
यावेळी माजी सरपंच गणपत काळभोर, साधना बँकेचे अध्यक्ष सुभाष काळभोर, संचालक संजय गुजर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, उपसरपंच बाबासाहेब काळभोर, भाजपाचे धर्मेंद्र खांडरे, नवपरिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, ह.भ.प. विनोद महाराज काळभोर, पुनम चौधरी, कमलेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य रमेश कोतवाल, नासीरखान पठाण, सचिन दाभाडे, राजश्री काळभोर, मंदाकिनी नामुगडे, राणी विजय बडदे, नितेश लोखंडे सदस्य, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश बडदे, विकी नामुगडे, अभिजीत बडदे, दिपक काळभोर, ग्रामस्थ, महिला भगिनी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत कदमवाकवस्तीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त गरजु महिलांना पीठ गिरणीचे वाटप तसेच किशोरवयीन मुलींसाठी सॅनीटरी पॅड मशिनचे वाटप व अंगणवाड्यांना अग्निशमन यंत्र वाटप करण्यात आले. तसेच नवपरिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने ३५०० नोंदणी झालेल्या नागरीकांना मोफत इ श्रम कार्ड वाटप, मोफत आरोग्य शिबीर, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, व वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
यापुढे बोलताना प्रदीप कंद म्हणाले, ” थोड्याच दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कदमवाकवस्तीच्या विकासासंदर्भात पाणीपुरवठ्याच्या योजनेचे काम लवकरच मार्गी लावू. तसेच लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, व फुरसुंगी शिवरस्त्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी केली असून हा रस्ता मंजूर झाल्यास पुणे-सोलापूर महामार्गावर येणारी वाहतूक कमी होईल.