विशाल कदम
हडपसर : हडपसर व परिसरातील मुलांसाठी मोफत कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन यांचा स्त्युत्य उपक्रमाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
मोफत कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक मारुती तुपे, भाजप शहर उपाध्यक्ष जीवन जाधव, ओबीसी मोर्चाच्या शहर उपाध्यक्षा स्मिता गायकवाड, सरचिटणीस गणेश घुले, उपाध्यक्ष युवराज मोहरे, आरपीआयचे पुणे शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्मितसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता गायकवाड म्हणाल्या की, सध्या गुंडगिरीचे व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. आणि त्याला आळा बसण्याच्या अनुषंगाने येथे कराटे प्रशिक्षण सुरू केले आहे. मुलांमध्ये मोबाईल हाताळण्याचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी व मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी या कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. कराटे खेळण्याचे शिकल्याने आपल्या कुटुंबाचे संरक्षण करता येते. आपली प्रतिकारशक्ती वाढते, आपण निरोगी व फिट राहतो, शिस्त लागते, आत्मविश्वास वाढतो असे स्मिता गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी ग्लोबल स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमी मधील कराटे खेळणाऱ्या मुलांनी कराटे प्रात्यक्षिक करून दाखविले. ग्लोबल स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमीचे प्रशिक्षक गिरीष बागलकोटकर हे तिथे प्रशिक्षण देणार आहेत. हे कराटे प्रशिक्षण चितोडीया महाराज यांच्या सहकार्याने घेण्यात येणार आहे. हे कराटे प्रशिक्षण आठवडयातील चार दिवस (सोम, बुध, शुक्र, रवि) वेळ : ६ ते ७.३० वा, स्थळ: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हॉल, रासगे अळी, दत्त मंदिर समोर, हडपसर गाव येथे घेणार असून पूर्णपणे मोफत घेणार होणार आहे. आतापर्यंत २०० मुलांनी या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. तर या उपक्रमासाठी स्मितसेवा फाउंडेशनचे बहुमूल्य योगदान मिळाले आहे.
यावेळी देविदास बिनावडे, तुषार गायकवाड, सचिन शेवाळे, सतीश भिसे, गणेश कवडे, कृष्णाजी सोनवणे, सुखदेव कांबळे, आशिष आल्हाट, महामुनी सर, मारुती भुजबळ, पानसरे सर, काशिनाथ भुजबळ, धीरजकुमार धरवडे, श्याम ओगाले, जालनापुरे सर, सुरेखा कवडे, कविता राठोड, निकिता निंगाले, मोहिनी शिंदे, कविता पाटील, मीना जगताप, रुपाली पाटील, भगीरथी पाटील, उज्वला ढवळे, शर्मिला डांगमाळी, नेहा निंगाले, जयश्री ताई इत्यादी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्मितसेवा फौंडेशन सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते निलेश बडे यांनी केले.