पुणे : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे.
शिवसेना उपनेते असलेल्या आढळराव पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेल्या नव्या कार्यकारिणीत पुनः मानाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. मध्यंतरी सामना या दैनिकातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे ते चांगलेच दुखवले गेले होते.
मात्र त्यानंतर हे त्यांची हकालपट्टी मागे घेण्यात आली होती. पण या कृत्याने आढळराव पाटील दुखावले आणि शिवसेनेपासून मनाने दूर झाले, असे बोलले जात होते. तेव्हाच ते शिंदे गटात जातील अशीही चर्चा होती. आज मात्र त्यांनी खरेच शिंदे गटात प्रवेश केला असून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.