मुंबई : शंभर कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविषयी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
देशमुख आर्थर रोड जेलमध्ये अचानक चक्कर येऊन पडले. त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आजच्या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहत आहेत. ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) मार्फत चौकशी करण्यात येत असलेल्या 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात सध्या देशमुख जेलमध्ये आहेत.
त्यांची प्रकृती बघता जेल प्रशासनाकडून त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.