Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी ; साहित्य क्षेत्रातून होतीये आग्रही मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 September 2023, 21:19

पुणे / राजेंद्रकुमार शेळके : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नव्याने निवड करताना विख्यात साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना संधी द्यावी, या मागणीने साहित्य क्षेत्रात जोर धरला आहे. राज्यातील नामांकित साहित्यिकांसह साहित्यिक चळवळीत काम करणाऱ्या २० हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

साहित्य, कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावे. त्या-त्या क्षेत्रातील प्रतिनिधींनी त्यांचे प्रश्न आणि समस्या सत्ताधाऱ्यांसमोर मांडाव्यात, यासाठी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड होत असते. या सदस्यांच्या नावाची शिफारस सरकार राज्यपालांकडे करत असते. साहित्य क्षेत्रातून प्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांना संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.

तसेच राजकीय पुनर्वसन म्हणून कुणाचीही वर्णी लावू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याप्रमाणेच तब्बल २० हजारांहून अधिक जणांनी आपल्या मागणीचे निवेदन हजारो स्वाक्षऱ्यांसह राज्यपाल, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केले आहे. एखाद्या साहित्यिकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनाधार प्राप्त होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असणार आहे.

 

शरद गोरेंनी केली अखिल भारतीय साहित्य परिषदेची स्थापना

शरद गोरे यांनी सन १९९३ मध्ये अखिल भारतीय साहित्य परिषदेची स्थापना केली. साहित्य परिषदेचे महाराष्ट्रसह देशाच्या इतर मराठी भाषिक प्रांतातही सभासद असून, आजवर संस्थेने १५० हून अधिक साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यांनी महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेर देखील अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संमेलने घेतलेली आहेत.

गोरे यांनी केले १० ग्रंथांचे लखन

नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, बेळगाव मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी आदी संमेलनांचा यामध्ये समावेश आहे. गोरे यांनी आतापर्यंत एकूण १० ग्रंथाचे लेखन केलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य भाषांतरित केला आहे. यामुळे बुधभूषणकार अशी त्यांची ख्याती आहे. युगंधर प्रकाशन या संस्थेचे ते संपादक व प्रकाशक आहेत. या संस्थेने आजवर १४४ दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांनी लेखक, दिग्दर्शक व संगीतकार म्हणून पाच चित्रपट व एक नाटक केले आहे. ज्यामध्ये रणांगण एक संघर्ष, उषःकाल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास, सूर्या ऐतवी, फुल टू हंगामा आदी चित्रपटांचा समावेश आहे.

उत्तम शिवव्याख्याते म्हणूनही प्रसिद्ध

शरद गोरे हे उत्तम शिवव्याखाते म्हणून ते महाराष्ट्रास परिचित आहेत. आजवर विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात अशी भरीव कामगिरी करणाऱ्या गोरे यांना या क्षेत्राच्या प्रगतीसाठी विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post

पोलिसांचं असंही हळवं मन ! डोळे पाणावले, सेवानिवृत्तीच्या दिवशी साहेबांनीच त्यांच्या गाडीतून घडवली सफर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.