दीपक खिलारे
इंदापूर : राज्याचे माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे शासन परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह माजी खा. शिवाजी आढळराव-पाटील, गणेश मधुकर बिडकर, माजी राज्यमंत्री विजय सोपान शिवतारे यांना जिल्हा नियोजन ज्ञान असलेले नामनिर्देश सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.
अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीची यादी जाहीर करण्यात आली आहे.