Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Election : राज ठाकरेंचे शिलेदार गायब! मनसेच्या उमेदवारांचं निवडणुकीपूर्वीच अपहरण?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 January 2026, 17:36
election

photo- social media

Election :  राज्यात महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सगळे पक्ष जोरात मैदानात उतरले आहेत. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. 30 डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानं आता कोण कुणाविरुद्ध लढणार, कोणाला कुठल्या पक्षाकडून तिकीट मिळालंय, हे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. (Election)

अशातच अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत उभे असलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत. गेल्या २४ तासांपासून त्यांचा कुटुंबीयांशीही संपर्क नाही, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी दिली आहे.

केडगाव परिसर संवेदनशील असल्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीच हे अपहरण झालं असावं, असा संशय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी या गायब उमेदवारांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांपैकी एक उमेदवार भाजपच्या, तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात होता. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गायब उमेदवारांचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.

 

दरम्यान, या सगळ्या घडामोडींमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युतीही चर्चेचा विषय ठरतेय. तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ही युती महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील ज्ञानेश्वरी कांचनची जिल्हास्तरावर झेप ; स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

Saturday, 19 September 2026, 15:24

विलास घुले हत्या प्रकरणात CID चा मोठा खुलासा! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला क्लीन चिट; चार्जशीटमध्ये काय?

Saturday, 19 September 2026, 15:06

‘अजितदादांची बारामती’! डोर्लेवाडीत गौरी-गणपतीच्या देखाव्यातून बारामतीच्या विकासाची झलक

Saturday, 19 September 2026, 14:39

“अजून किती विद्यार्थ्यांचे बळी जाणार?”आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणावर अभिजीत दीपकेंचा संतप्त सवाल; सरकारवर जोरदार हल्लाबोल!

Saturday, 19 September 2026, 14:28

IIT मुंबईत विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल!पोलिसांकडून ADR दाखल, सात महिन्यांत चौथा बळी, विद्यार्थ्यांचं आंदोलन..

Saturday, 19 September 2026, 14:17

मुंढव्यातील 32 वर्षीय महिलेवर PIT-NDPS अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई! ड्रग्जच्या कथित व्यवहाराप्रकरणी पोलिसांचा दणका; पुण्यात पहिलीच अशी कारवाई…

Saturday, 19 September 2026, 14:13
Next Post

लोणी काळभोरमध्ये ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता नेट सुविधा थेट बंद; हजारो इंटरनेट ग्राहकांना आर्थिक फटका, प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp