Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता नेट सुविधा थेट बंद; हजारो इंटरनेट ग्राहकांना आर्थिक फटका, प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 January 2026, 18:02

लोणी काळभोर, ता. 1: शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोरसह परिसरात खाजगी इंटरनेट सुविधा (internet service was abruptly shut down in  Loni Kalbhor) बुधवारी (ता. 31) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आली आहे. इंटरनेट सुविधा अचानक बंद केल्यामुळे याचा हजारो ग्राहकांना फटका बसला आहे. तर दुकानदार, रुग्णालये, शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयांचे व्यवहार अडचणीत आले असून त्याचा दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पेरणे फाटा येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या काना-कोपऱ्यातून लाखो भीम अनुयायी येतात. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र राज्य गृह विभागाचे अतिरिक्त सचिव यांनी खाजगी इंटरनेट सुविधा बंद करण्यासाठी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार लोणी काळभोर व वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाजगी इंटरनेट सुविधा बंद करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे दोन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांनी काटेकोरपणे पालन केले.

पोलीस प्रशासनाने खाजगी इंटरनेट चालविणाऱ्या चालक व मालकांसाठी एक आदेश जारी केला. आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इंटरनेट सुविधा बुधवारी (ता.31) रात्री बारा ते गुरुवारी (ता.1) रात्री अकरा वाजेपर्यंत बंद करण्यासाठी सांगितले. त्यानुसार खाजगी इंटरनेट चालकांनी याची कुठल्याही ग्राहकाला कल्पना न देता नेट सुविधा थेट बंद केली. याचा ग्राहकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर कर्मचाऱ्यांना कामावर येवून स्वतःच्या कपाळावर हात धरण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, थेऊर व तरडे या गावांमध्ये मोठमोठ्या कंपन्या, शैक्षणिक संकुले, दुकाने, दवाखाने, वित्तीय संस्था, नागरी सुविधा केंद्रे व विविध कार्यालये आहेत. या संस्थांमध्ये हजारो कामगार वर्ग काम करत आहेत. सध्या आधुनिक युग चालू असल्याने सर्व व्यवहार हे इंटरनेटच्या माध्यमातून होतात. कामगारांना कामावर हजेरी लावण्यासाठीसुद्धा पंचिंग करावी लागत आहे. परंतु, इंटरनेट सुविधा बंद पडल्यामुळे कामगारांना तासंतास एकाच जागेवर खोळंबत बसावे लागले. काही कार्यालये नेट बंद केल्यामुळे आज बंद ठेवावी लागली. याचा अनेक कार्यालयांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.

 

मोबाईल इंटरनेट सुविधा चालू कशी?

शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खाजगी इंटरनेट सुविधा बंद केली आहे. प्रशासनाचा हा निर्णय अतिशय योग्य आहे. परंतु, मोबाईल इंटरनेट सुविधा चालू ठेवली आहे. जर एखादी घटना घडली तर मोबाईलवरून लवकर व्हायरल होऊ शकते? त्यामुळे प्रशासनाला नेमके साध्य काय करायचे आहे. ते अद्यापपर्यंत न समजलेले कोडे आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आदेश ‘लोणी कंद’साठी की ‘लोणी काळभोर’साठी?

मागील अनेक वर्षापासून भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त इंटरनेट सुविधा बंद केली जाते. ठीकठिकाणी जामर लावले जातात. परंतु, यावर्षी लोणी काळभोरला खाजगी इंटरनेट सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश लोणी कंद ऐवजी चुकून लोणी काळभोरला तर झाले नसतील ना? असा सवाल नागरिकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. परंतु. या आदेशामुळे नागरिकांची मोठी दमछाक झाली आहे.

 डिजीटल युगात इंटरनेट व नेटवर्क सुविधा अत्यावश्यक आहे. इंटरनेट सुविधा बंद केल्यामुळे अत्यावश्यक सेवांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांच्या कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोणतीही पूर्वसूचना अथवा पर्यायी व्यवस्था न करता नेट बंद करणे म्हणजे नागरिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. या सुविधेमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांनी तक्रारी कराव्यात. आम्ही आवाज उठवून संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

– संदीप शिवरकर (अध्यक्ष – अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुका)

 

पंचक्रोशीत आमचे नावाजलेले दुकान आहे. नवीन वर्षानिमित्त अनेक ग्राहकांनी आमच्या दुकानात भेटी दिल्या.   कामावर सर्व कर्मचारी हजर आहेत. परंतु, इंटरनेट चालकांनी कोणतीही कल्पना न देता इंटरनेट सुविधा बंद केली आहे. बिलिंग करता येत नसल्यामुळे अनेक ग्राहक माघारी गेले आहेत. त्यामुळे आम्हाला खूप मोठा आर्थिक फटका असला आहे. याबाबत आम्ही ग्राहक पंचायत समितीकडे दाद मागणार आहेत. तसेच पोलीस ठाण्यात तक्रारही देणार आहे.

-एक ग्राहक (लोणी काळभोर, ता. हवेली)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

Saturday, 29 August 2026, 11:45

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! 1 किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

Saturday, 29 August 2026, 11:35

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच, साडे 5 लाखांची लाच घेताना दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात, माळशिरस तालुक्यात एसीबीची धडक कारवाई

Saturday, 29 August 2026, 11:29

पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून रस्त्यात अडवलं; पुण्यात पुढे जे घडलं ते धक्कादायक

Saturday, 29 August 2026, 11:18

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक; चांदीही महागली; जाणून घ्या आजचा भाव

Saturday, 29 August 2026, 11:06

प्रेयसीला आजार असल्याचे कळताच प्रियकराने बदलले रंग! पुण्यात 19 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 29 August 2026, 10:39
Next Post
Pune News

Pune News : दौंड बसस्थानकाचा होणार कायापालट; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश, ७ कोटींचा निधी मंजूर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp