Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंडमध्ये थरारक बालहत्याकांड! वडिलांनीच ९ वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग, सहकारी महिलेलाही अटक

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 13:00
duaghter murdered her mother with help of friend pune

दौंड, ता. ५ : दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे मानवतेला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ शाळेच्या निकालावरून संतापलेल्या वडिलांनी आपल्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या करून नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी घरालाच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता.३) दुपारच्या सुमारास उघडकीस आला आहे. या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. Daund News

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम दुर्याधन चव्हाण (वय ३३) याने आपल्या मुलगी अनामिका (वय ९) हिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात चिंगु शिंदबाद भोसले या महिलेलाही अटक करण्यात आली असून तिने घटनेची माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. Daund News

निकालावरून वाद, संतापाचा स्फोट
घरातील मुलांच्या शाळेच्या निकालावरून वाद सुरू झाला. मुलगा संस्कार याला पहिला क्रमांक मिळाला, तर मुलगी अनामिकाने भावाच्या गुणपत्रिकेत खोडाखोड केल्याची बाब समोर आली. यामुळे संतापलेल्या वडिलांनी प्रथम अनामिकेला मारहाण केली. घाबरलेली मुलगी घरात उपस्थित असलेल्या महिलेच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपीने निर्दयीपणे लाकडे कापण्याच्या मशीनने तिच्यावर वार केले. Daund News

 

निर्घृण हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
या हल्ल्यात अनामिकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवला आणि काही वेळाने घराला आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर आरोपीने मुलांना घेऊन गावात फेरफटका मारल्याचीही माहिती समोर आली आहे. Daund News

पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती नातेवाईकांकडून बाहेर येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जळालेल्या घरात तपास करताना अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मुलीचा मृतदेह सापडला. घटनास्थळी रक्त लागलेले मशीन, जळालेल्या वस्तू आणि इतर महत्त्वाचे पुरावेही आढळले. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे. Daund News

दरम्यान,   प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ अंतर्गत कलम १०३(१), २३८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करत आहेत. या भीषण घटनेमुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेने पुन्हा एकदा कुटुंबातील हिंसाचाराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. Daund News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.