उरुळी कांचन (पुणे) : भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहर विद्यार्थिनी आघाडी उपाध्यक्षपदी साक्षी संतोष कांचन, महाविद्यालयिन विद्यार्थिनी आघाडी उपाध्यक्षपदी मयुरी संदीप लोणारी तर शहर अनुसूचित जाती महिला मोर्चा उपाध्यक्षपदी रेश्मा संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे भाजपाच्या वतीने मंगळवारी (ता.१) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वरील तिघींना भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद व भाजपा हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी भाजपा हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, रेल्वे क्षेत्रीय समिती सदस्य अजिंक्य कांचन, कोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, पुणे जिल्हा महिला सरचिटणीस पूनम चौधरी, अनिल सातव, विजय जाचक, ग्रामपंचायत सदस्या ऋतुजा कांचन, भाजपा शहराध्यक्ष अमित कांचन, खुशाल कुंजीर, सुनील तुपे, आबासाहेब चव्हाण, ऋषिकेश ढवळे, आशुतोष तुपे, निलेश कानकाटे, ऋषिकेश शेळके, गणेश घाडगे, अक्षय रोडे, शुभम वेदपाठक, ऋतुजा कांचन, रूपाली कांचन, सीमा जगताप, रेखा तुपे, पूजा सणस, काजल खोमणे, साक्षी ढवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी चोख पार पाडून पूर्व हवेलीत पक्षाची ताकद घरोघरी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन निवडीनंतर कांचन, लोणारी, कांबळे यांनी सांगितले.