सातारा : सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा दौरा म्हंटल की, कार्यकर्त्यांची गर्दी हे समीकरण झाले आहे. या गर्दीत रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस यांची निवड करण्यात आली. सदरच्या निवडीच्या वेळी कार्यकारिणी निवडीसाठी झालेल्या बैठकीतून चक्क एका जेष्ठ रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांना बेदखल केले गेले. त्यामुळे मानापमान नाट्य घडून रिपाइं जेष्ठ नेत्यांनी सातारा शासकीय विश्रामगृहातून नाराज होऊन बाहेर पाडण्यात धन्यता मानली.
लोकशाही संकेत नुसार रिपब्लिकन पक्षाच्या सर्व विभागाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडीसाठी पक्ष निरीक्षक डॉ तात्यासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा विश्रामगृहात रिपाइं पक्षाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला रिपाइं जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष अशोक गायकवाड व सरचिटणीस पदी आप्पा गायकवाड यांची एकमताने व जल्लोषात निवड करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कृणाल गडांकुश,सौ हेमलता गायकवाड,सचिन वायदंडे, मयूर बनसोडे,स्वप्नील गायकवाड ,जयवंत विरकायदे, सौ ज्योसना सरतापे, सौ अनिता तोरणे, ऍड शहनवाज मुसा काजी,आप्पा तुपे,विकास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन पक्ष व भाजप तसेच मित्र पक्षाच्या वतीने अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पेढे भरवून अभिनंदन केले.तसेच सेल्फी व फोटो काढण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती.