कर्नाटक Election News : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवारी) मतदान होत आहे. (Election News) मतदानाच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. (Election News)
समाज माध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल
समाज माध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. व्हिडीओमधील दाव्यानुसार कर्नाटकामध्ये आज एका भाजप नेत्याच्या गाडीत एव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिकस लोकांनी या वाहनात असलेल्या ईव्हिएम मशीनला पकडले आहे. यामुळे येथे लोकांमध्ये प्रचंड उद्रेक दिसून आला. यावेळी रस्त्यावर लोकांनी रोष व्यक्त केला. वाहनातील इव्हीएम मशीन काढून तोडफोड केली, अशा आशयाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदानास आज सुरवात झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगाची कडक सुरक्षा यंत्रणा ठेवली आहे.
यावेळी या ठिकाणी जमलेल्या जनतेने तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी भाजपविरूद्ध जोरदार घोषणा दिल्या. जनता आता जागरूक झालेली आहे. अशा प्रकारामुळे भाजपची आता काही खैर नसल्याचे य़ेथे जमलेल्या नागरिकांनी म्हंटले आहे. यामुळे आता पुन्हा ईव्हीएमबाबत (EVM) चर्चा होत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ कर्नाटकातील कोणत्या भागातला आहे, याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, हा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नागरिक भाजपविरोधी घोषणा देताना दिसत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Election : पुणे बाजार समिती निवडणुक ; संतोष नांगरे मोठ्या मताधिक्याने विजयी…