अजित जगताप
वडूज Election : शेती उत्पन्न बाजार समिती वडूज (Vaduj Agricultural Produce Market Committee) (ता. खटाव जिल्हा सातारा) संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये (Election) आज भर उन्हातही मतदारांनी मतदान करून खऱ्या अर्थाने आपल्या हक्क बजावलेला आहे. (Election) आज वडूज, मायणी, पुसेगाव या ठिकाणी सोसायटी मतदासंघात १२९१ मतदारांपैकी १२६५, हमाल मापाडी – ९५४ पैकी ७१९, व्यापारी -८२१पैकी ७०६, ग्रामपंचायत -१ १५४ पैकी ११०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ४२३० पैकी२७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (Election)
गेले महिनाभर बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक वावड्या उठवल्या गेल्या होत्या. निवडणूक बिनविरोध व्हावी. ही प्रत्येकांची इच्छा होती. परंतु ,टोपल्यात भाकरी पाच आणि खाणारे अठरा अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्वांना संधी देणे अशक्य आहे. याची जाणीव काही नेत्यांना झाल्यामुळे ‘आधे उधर जाऊ, बाकी मेरे पीछे आव’ या पद्धतीने राजकारण सुरू झाले.
नेत्यांनी एकत्र येऊन खटाव तालुका विकास आघाडीची स्थापना
राजकीय दृष्ट्या विविध विचार सरणी असलेल्या काही नेत्यांनी एकत्र येऊन खटाव तालुका विकास आघाडीची स्थापना केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी हात मिळवणे केली. यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष व अपक्षांनीही आपली उमेदवारी तशीच ठेवून ‘ हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. आज मोठ्या संख्येने दोन्ही पॅनलच्या समर्थकांनी वडूज, मायणी, पुसेगाव या ठिकाणी गर्दी केली होती.
मतदार यादी मधील प्रत्येक मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतं केंद्रापर्यंत आणून त्यांचे मतदान करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. ज्या कालावधीमध्ये काही मतदारांना आमिष दाखवण्यात आली होती तर काहींनी आपली इच्छा व्यक्त केली परंतु लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे व सद्विवेक बुद्धीला जागून मतदान केले.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्यातील इतर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये मतदासंघ निहाय किती मतदान झाले? याची आकडेवारी प्रत्येक तासाला मिळत होती. परंतु अशी आकडेवारी वडूज शेती उत्पन्न बाजार समितीबाबत उपलब्ध झाली नाही. तरीसुद्धा काही स्वयंभू कार्यकर्त्यांनी मतदान आकड्डेवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली.
राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनलचे नेते प्रभाकर देशमुख, संदीप मांडवे, अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यातील सर्वसाधारण मतदार संघ उमेदवार दत्तात्रय घाडगे, आनंदराव घोरपडे, महेंद्र जगदाळे, अंकुश पवार, संतोष पवार, तुषार माने, नारायण माने, महिला राखीव वैजयंती तुपे, पार्वती यादव, इतर मागासवर्गीय राखीव प्रसाद गुरव ,विमुक्त जाती भटक्या जमाती राखीव शरद खाडे ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रतिनिधी अभिजीत जाधव, सुनील मोरे ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक राखीव अशोक कदम, अनुसूचित जाती जमाती राखीव शैलेंद्र वाघमारे हे टेबल या चिन्हावर नशीब आजमावत आहेत.
खटाव तालुका विकास आघाडीने या ठिकाणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखाली खटाव तालुका विकास आघाडीने सर्वसाधारण मतदारसंघातून महेश घार्गे, अभिजीत देशमुख, ज्ञानेश्वर नलवडे, दत्तात्रय पवार, राहुल फडतरे, सुनील फडतरे, विजयकुमार शिंदे महिला राखीव मधून लता जगदाळे, सुनीता मगर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी दीपक विधाते, जाती भटक्या जमाती प्रतिनिधी शरद पाटील, ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रतिनिधी वसंत पवार, अण्णा वलेकर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विनोद घार्गे, अनुसूचित जाती जमाती अमरजीत कांबळे, व्यापारी- जयवंत जगताप, किरण माळवे, पांडुरंग झगडे हे ट्रॅक्टर चिन्हावर तसेच इतर अपक्ष उमेदवार मतदारांनी मते दिलेले आहे. महाराष्ट्र दिन १ मे रोजी मतमोजणी होणार असून विजयाचा जल्लोष कोण करणार? हे लवकर स्पष्ट होणार आहेत.
या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा जोडली गेली असल्यामुळे संपूर्ण खटाव तालुक्याचे लक्ष शेती उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीकडे लागले आहे. वडूज पोलीस ठाण्याचे स पो नि दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. दोन्ही पॅनल प्रमुखांनी ही निवडणूक प्रतिष्ठित केल्यामुळे आज खटाव तालुक्यातील परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते.
आर्थिक दृष्ट्या वडूज शेती उत्पन्न बाजार समिती ही संकटात आली असली तरी या निवडणुकीत किमान कोटभर रुपयांचा आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती राजकारणातील अभ्यासक धनाजी चव्हाण यांनी दिली. या निवडणुकीत दोन्ही पॅनलचे प्रमुख तसेच त्यांना समर्थ साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठ दिवस परिश्रम घेतलेले आहेत या निवडणुकीबाबत अनेकांनी पाहिजे ही लावलेले आहेत उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत प्राथमिक चित्र स्पष्ट होणार आहे.
पुसेगाव मतदान केंद्रात शंभर टक्के मतदान झाले. तर काहींनी हमाल मतदार कार्ड मध्येच खाडाखोड केली होती. त्यांना समज देवून स. पो. नि. दत्तात्रय दराडे यांनी त्यांना वडूज मतदान केंद्रातून बाहेर काढले.
मतदारांना मतदान केंद्रातच माहिती देण्याबाबत उमेदवार फडतरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवार यांच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली. अखेर वडूज पोलीस ठाण्याचे स. पो. नि. दराडे यांनी त्यांना समजून सांगितले. दोन्ही पॅनल प्रमुख मंडपात बसून कार्यकर्त्यांना सूचना देत होते. पुसेसावळी येथील गोरेगाव ( निमसोड) येथील मतदार वडूज मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आले होते.
असे झाले मतदान ….
ग्रामपंचायत -९६ टक्के
सोसायटी -९८ टक्के
व्यापारी -८ ६टक्के
हमाल -७५ टक्के
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुर्लक्षितपणाने शेती पिकांचे नुकसान…!
Vaduj News : वडूज बाजार समितीला ऊर्जेतावस्थेत आणण्यासाठी खटाव विकास आघाडीची’ ब्लू प्रिंट’ तयार…