Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘इंद्रायणी थडी’त साकारणार भाजपा पक्षनिष्ठचे प्रेरणास्थळ!भाजपाच्या दिवंगत आमदारांचा अर्धाकृती पुतळा उभारणार -आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून स्मृतींना उजाळा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 January 2023, 17:47

पिंपरी : ‘‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:’’ असे ब्रिद घेऊन भारतीय जनता पार्टीचे काम करणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, बाबुराव पाचर्णे यांच्यासह माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘‘इंद्रायणी थडी’’ महोत्सवात पक्ष निष्ठेचे प्रेरणास्थळ साकारण्यात येणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील गावजत्रा मैदानावर दि. २५ ते दि. २९ जानेवारी २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘इंद्रायणी थडी-२०२३’ महोत्सव आयोजित केला आहे. तब्बल १७ एकर जागेत संपूर्ण महाराष्ट्रातील १ हजार स्टॉल उभारण्यात आले आहेत.

महोत्सवामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती, ग्राम संस्कृती, खाद्य महोत्सव, बाल जत्रा, परंपरिक खेळ, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, पाटील वाडा प्रतिकृती, भजन महोत्सव, मर्दानी खेळ, विविध भागातील कलाकृती आणि हस्तकला प्रदर्शन, खेळ रंगला पैठणीचा, मंगळगौर खेळ यासह फॅशन शो, महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर, सिनेतारका नृत्य, पारंपरिक नृत्य, जादूचे प्रयोग, झुंबा डान्स अशा विविध कार्यक्रम एकाच छताखाली उपलब्घ आहेत.

 

यासह आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आणि बेरोजगार तरुणांना संधी देण्यासाठी नोकरी महोत्सवसुद्धा होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने नियोजन केले आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

पक्षाप्रति शेवटपर्यंत ठेवलेल्या निष्ठेचे होणार स्मरण…
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात जगताप यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या घराण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौरपद भूषवले आहे. कसबा मतदार संघ पुण्याच्या विकासात त्यांचे योगदान राहीले आहे.

मावळ विधानसभा मतदार संघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिगंबर भेगडे आणि शिरुर मतदार संघातील माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचेही निधन झाले. या दोन्ही नेत्यांनी ग्रामीण भागात भाजपा वाढवण्यासाठी योगदान दिले आहे.

आमदार जगताप आणि टिळक यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत आजारी असतानाही व्हीलचेअरद्वारे मतदानासाठी विधान भवनात पोहोचले होते.

त्यावेळी ‘‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:’’ अशी शिकवण आम्हाला आमचा पक्ष देतो. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्र आणि पक्षाशी निष्ठा ठेवलेल्या या नेत्यांचे स्मरण ‘इंद्रायणी थडी-२०२३’ महोत्सवास येणाऱ्या नागरिक, कार्यकर्त्यांना व्हावे, यासाठी पक्ष निष्ठा प्रेरणास्थळ साकारण्यात येत आहे, अशी माहिती महोत्सवाचे समन्वयक संजय पटनी यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

पुण्यात सख्ख्या काकानेच दोन अल्पवयीन पुतणींवर केला अत्याचार ; खडक पोलिसांनी दोन्ही नराधमांना ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.