उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने स्थगिती दिली असून निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी (ता. ०४) जानेवारीला तर मतमोजणी गुरुवारी (ता. ०५) होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी दिली आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुकासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने २९ नोव्हेंबरला स्थगिती दिली होती. हि स्थगिती सहकार खात्याने उठवली व हि निवडणूक प्रक्रिया रविवारी १ जानेवारी २०२३ रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलली असून रविवारी होणारी निवडणूक बुधवारी (ता. ०४) जानेवारीला तर मतमोजणी गुरुवारी (ता. ०५) होणार आहे.असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी यावेळी दिली आहे.