लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून “नवपरिवर्तन पॅनेल”चे सरपंच पदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घरोघरी जाऊन आपल्याच पॅनेलला मत देण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, नवपरिवर्तन पॅनेलला मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता सरपंच या नात्याने “मी” व माझे १७ सहकारी मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग एकमधील कवडीमाळवाडी परिसरात कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्तरंजन गायवाड बोलत होते.
विद्यमान सरपंच गौरी गायकवाड, चित्तरंजन गायकवाड त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मागील तीन वर्षापासून पाठपुरावा करून कदमवाकवस्तीसाठी ९० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी विरोधी पॅनेल हा मतदार नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून पाणीपट्टी वाढ होण्याचा खोटा प्रचार करीत आहेत. मात्र कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीवर सत्ता हि “नवपरिवर्तन पॅनेल” चीच येणार असल्याचा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच गौरी गायकवाड, देवाआण्णा काळभोर, राहुल झेंडे, धनंजय कामठे, जगन्नाथ लडकत, प्रीतम गायकवाड, माऊली काळभोर, संजय काळभोर, संदेश काळभोर, अशोक शिंदे, शिवाजी कदम, सूर्यकांत नामुगडे, रमेश कोतवाल, आकाश काळभोर, सिमिता लोंढे, कोमल काळभोर, बीना काळभोर, मंदाकिनी नामुगडे, राजश्री काळभोर, दीपक अढाळे, सुनंदा काळभोर, नासीरखान पठाण, अभिजित बडदे, रुपाली काळभोर, स्वप्नील कदम, अविनाश बडदे, सोनाबाई शिंदे, योगेश मिसाळ, सलीमा पठाण, राणी गायकवाड आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, “विरोधी पॅनेल हा खोटे बोल पण रेटून बोल असा दावा करत आहेत. कदमवाकवस्तीला येणाऱ्या पुढील ४० ते ५० वर्षात पाणी कमी पडणार नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. जेवढ्या प्रमाणात आता पाणीपट्टी येते तेवढ्याच प्रमाणात पुन्हा पाणीपट्टी येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संभ्रम निर्माण होऊ देऊ नये. स्वतः काही करायचे नाही आणि लोकांनी केलेल्या कार्यात खोडा घालण्याचे काम विरोधी पॅनेल करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या १८ तारखेला मतदानाच्या स्वरुपात जनता “नवपरिवर्तन पॅनेल” च्या १७ च्या १७ जागेवर निवडून देणार आहे. तसेच कदमवाकवस्तीत चांगले वातावरण असून पुन्हा एकदा कदमवाकवस्तीवर सत्ता हि “नवपरिवर्तन पॅनेल”चीच येणार आहे.
दरम्यान, प्रचाराला अवघे दोन दिवस राहिले असल्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत नवपरिवर्तन पॅनेलने कोपरा सभांबरोबर रोड शो, मोटारसायकल रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभा, वैयक्तिक गाठीभेटींच्या आयोजनामुळे प्रचाराला चांगलाच जोर धरला आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठा निधी आणून गावात विकास कामे मतदारांनी पाहिली आहेत. आगामी काळात मतदारांना विकास हवा आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलच्या मागे मतदारांनी आपली मोठी ताकद उभी केली आहे. त्यामुळे नवपरिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत, असे मत नवपरिवर्तन पॅनलचे सदस्य आविनाश बडदे यांनी पुणे प्राईम न्यूजशी बोलताना व्यक्त केले.