Devendra Fadnavis | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवल्याची फोन करून धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (ता.२७) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती.
या घटनेचा पोलिसांनी कसून तपास करुन फेक कॉल करणाऱ्याच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवल्याची फोन एका अज्ञात व्यक्तीने केला होता. बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच पोलीस यंत्रणा सतर्क झाली.
नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी तपास केल्यानंतर हा फोन फेक असल्याचे समोर आले. नागपूर पोलिसांनी अधिक तपास करत धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्ती कन्हान परिसरात राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी धमकीचा फोन केलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Toll Price Hike : मुंबई-पुणे प्रवास एक्स्प्रेसवेवरील टोल वाढला, ‘हे’ आहेत नवे दर
Pune News : कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद