Dehu News : देहू : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावरून देहू संस्थानकडून देखील वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. (Dehu Sansthan condemns attack on Warkaras; A call to reflect on the incident!)
प्रशासनाने आणि वारकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी
दरम्यान, वारकरी लाठीमारप्रकरणी बोलताना देहू विश्वस्त म्हणाले की, काल आळंदीत वारकऱ्यांवर झालेली लाठीचार्जची घटना निंदनिय आहे. प्रशासनाने आणि वारकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. (Dehu News ) वारकरी हा सहिष्णू असतो. त्यांना अशा प्रकारे पोलिसांनी अडवायला नको होतं. महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम पोलिसांनी केलं आहे. वारकरी हे पोलिसांना सहकार्य करतीलच. प्रशासनानं या घटनेचं आत्मचिंतन करावं. या घटनेचा खोलवर तपास करावा, असं देहू विश्वस्तांनी म्हटलं आहे. (Dehu Sansthan condemns attack on Warkaras; A call to reflect on the incident!)
पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरातील गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना केली. असं असतानाही काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. (Dehu News ) या वेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. लाठीमार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या बडतर्फीची मागणी करण्यात येत आहे. तसंच, याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.
लाठीमार प्रकरणावरून विरोधकांनी देखील टीकास्त्र सोडलं असून, समाजाच्या सर्वच स्तरांतून वारकऱ्यांवरील लाठीमाराच्या घटनेचा तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Dehu News : निकोप राजकारणासाठी रोहित पवार यांचे तुकोबाचरणी साकडे; म्हणाले…
Dehu News : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकरी हरिनामात दंग
Dehu News| देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे ; उमेश मोरेंचा केला नऊ मतांनी पराभव…!