संदीप टूले
Daund News : देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू असल्याने देश प्रगतीच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावरून 5 व्या स्थानावर आपण आलो आहोत. बाकीच्या देशांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. जलसंपदा विभाग खडकवासलाचे पाणी टनेलच्या माध्यमातून आणण्यासाठी 2 हजार कोटी आणि 14 हजार कोटींची जागा वापरण्यास मिळणार आहे. त्यामुळे अडीच ते तीन टीएमसीचे पाणी उपलब्ध होणार आहे, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.(Daund News)
अडीच ते तीन टीएमसीचे पाणी उपलब्ध होणार आहे.
चौफुला (ता. दौंड) येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार कुल यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध चांगल्या योजना या सरकारच्या काळात आल्या असल्याचे सांगत योजनांवर भाष्य केले. ते म्हणाले, युद्ध सामग्री आयात करण्याऐवजी स्वदेशी साहित्य निर्मिती देशात सुरू झाली. पीएम आवास योजना असो अथवा कोरोना काळात योग्य नियोजन करून लस तयार करण्याचे काम केल्याने देशाची मान उंचावली आहे.(Daund News)
2024 ला मोदी पंतप्रधान होतील, अशी मानसिकता विरोधकांचीही झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षालाही केंद्र सरकारच्या कामामुळे त्यांना नावे ठेवायला जागा मिळत नाही. मुळशी धरणाचे पाणी आपल्या विभागात वळवण्यासाठीची प्रोसेस सुरू आहे. चिबड जमिनीबाबत मी प्रयत्न करतोय, त्यावर लवकरच नियोजन होईल. जनाई, शिरसाई योजना कार्यान्वित होऊन तालुक्यातील सर्व बंधारे भरण्याचा प्रयत्न राहील, असेही कुल यांनी सांगितले.(Daund News)
चांगले रस्ते सुरु झालं की दौंड सुरु
दौंड सुरू झालं की खराब रस्ते सुरू होतात अशी टीका व्हायची. आता चांगले रस्ते सुरू झाले की दौंड सुरू झालं असं म्हटलं जातं. 1500 कोटींची तालुक्यातील रस्त्यांची कामे होणार आहेत. कासुर्डी ते पाटस असा 80 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे. त्यामुळे लवकरच तेही काम सुरू होईल. हडपसर ते उरुळी असा भारत माला हा रस्ता होणार आहे. तालुक्यात केडगाव-चौफुला-न्हावरा या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.(Daund News)
10 हजार कोटींच्या तरतुदीमुळे फायदा
केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी 10 हजार कोटी रुपये तरतूद केल्याने त्याचा सर्वात मोठा फायदा हा शेतकऱ्यांनाच झाला आहे. कलम 370 रद्द करणे हा विषय त्यांनी व्यवस्थित मार्गी लावला. ग्रामीण भागाचा प्रतिनिधी म्हणून माझी आजही या भागासाठी काहीतरी नवीन देण्याचा, मागण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना या तालुक्यात आपण राबवत आहोत, असे त्यांनी शेवटी सांगितले.(Daund News)
दरम्यान, या कार्यक्रमाला भीमा पाटसचे व्हाईस चेअरमन नामदेवनाना बारवकर, हरिश्चंद्र ठोंबरे, उमेश देवकर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.