गणेश सुळ
Daund News केडगाव : दौंड तालुक्यातील देलवडी विविध विकासकामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये जलजीवन मिशन एक महत्वाकांक्षी योजना असून, योजनेच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने योजना राबवली जात आहे. (Daund News)
देलवडी येथे दौंडच्या माजी आमदार रंजना कुल यांनी शनिवारी (दि.6) प्रत्यक्ष पाहणी केली. या जलजीवन योजनेबरोबरच सभामंडप, दलित वस्ती योजनेअंतर्गत रस्ते व गटारीच्या कामाची पाहणी रंजना कुल यांनी केली. यावेळी त्यांनी खंडोबा मंदिर परिसरात पेव्हिग ब्लॉक बसवणे कामाचा शुभारंभ देखील केला. यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गावच्या विविध विकासकामांमुळे गावचा पायाभूत विकास होईल, असा आशावाद रंजना कुल यांनी व्यक्त केला. (Daund News)
गेल्या काही दिवसांपासून मागणी केली की निधीची पूर्तता असे चित्र आहे. त्यामुळे देलवडी गावात आज कोट्यवधीच्या कामांना सुरूवात होत आहे. चालू असलेल्या विविध विकासकामांबरोबरच गावातील विविध प्रश्न निकाली लागणार आहे. आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांमुळे हे सहज शक्य झाल्याचे भीमा पाटस कारखान्याचे संचालक विकास शेलार यांनी सांगितले. (Daund News)
यावेळी श्री जय म्हाळसाकांत पाणी पुरवठा सेवा सहकारी संस्था मर्यादित देलवडी या संस्थेतील सचिव दादासो बोधे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शेलार, संस्थापक उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार, पाटकारी मोहन शेलार यांच्या गौरवाचे आयोजन करण्यात आले होते. (Daund News)
या सर्व मान्यवरांना रंजना कुल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी रंजना कुल, विकास शेलार, तुकाराम ताकवणे, नीलम काटे, अयोध्या अडगले, बापूराव शेलार, राजाभाऊ शेलार, बाळासो जाधव, राजाभाऊ काटे, डी. आर. शेलार, दत्ताभाऊ शेलार, अर्जुन वाघोले, प्रकाश जाधव, अनिल वांझरे, माऊली शेलार, माधव टकले ग्रामपंचायत सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. (Daund News)