सौरभ सुतार
नीरा नरसिंहपुर : गणेशवाडी गावच्या विकासासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. गावचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आनेक योजनेतून गावच्या विकासासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहतील तसेच खंडोबाच्या सभा मंडपाला देखील ५ लाख रुपये निधी मंजूर केला असल्याचे प्रतिपादन इंदापूरचे आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
गणेशवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतिला जल जीवन मशीन अंतर्गत गावच्या स्वतंत्र पाणी पुरवठ्यासाठी १ कोटी १८ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याचे उद्घाटन माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी भरणे बोलत होते.
यावेळी प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, दत्तामामा घोगरे, श्रीकांत दंडवते, श्रीकांत बोडके, विजुभाऊ घोगरे, रविराज घोगरे, मयूर घोगरे, पांडुरंग डिसले, दादासाहेब क्षीरसागर, तुकाराम घोगरे, नरहरी काळे, चंद्रकांत सरवदे, आरुण क्षीरसागर, नागेश गायकवाड, प्रताप पालवे, विजय गायकवाड, पांडुरंग कांबळे, दत्तात्रय घोगरे, संतोष सुतार, पांडूदादा बोडके, सुदर्शन बोडके, नामदेव शिरसागर, नाथा रुपनवर, समाधान बोडके, उमेश घोगरे, विठ्ठल देशमुख, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना भरणे म्हणाले, “गेल्या ४० ते ५० वर्षापासून गणेशवाडी गावच्या विकासासाठी एवढा मोठा निधी कधीच आला नव्हता. माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हांडा खाली उतरावयाचा आहे. डोक्यावरती हंडा घेऊन पाण्याला गेली नाही पाहिजे. तोच हंडा खाली उतरवण्यासाठी प्रत्येक घरोघरी नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या माध्यमातून करण्यात येईल.”
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी केले तर प्रशांत पाटील, विजय गायकवाड, यांनी यावेळी प्रस्ताविक मध्ये आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच या भागातील सर्वच ग्रामस्थ व महिला भगिनी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पुणेजिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी केले.