दिनेश सोनवणे
दौंड : खानवटे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व अधिकाधिक विकासकामे अधिकाधिक विकासकामे करण्याचा मानस असून यापुढील काळातही कामे कशी मार्गी लागावीत यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले आहे.
दौंड तालुक्याच्या पुर्व सीमेवरील शेवटचा टोकावरील ग्रामपंचायत खानवटे (ता. दौंड) येथे सुमारे ६ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ४ कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना, गावठाण अंतर्गत रस्ते, दलित वस्ती सुधारणा, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, प्राथमिक शाळा वर्गखोल्यांचे व अंगणवाडी बांधकाम आदी विकासकांचा समावेश आहे. या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुल बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, गावच्या सरपंच नंदिनी शिरसट, उपसरपंच अभयसिंहराजे भोसले, आण्णासाहेब राजेभोसले, अर्जुनराव शिरसाठ, विलास पवार, मुकेश गुणवरे, युवराज शेंडगे, शरद ढवळे, बबनराव धायतोंडे, राजेंद्र झोड, हनुमंत भोसले, दत्तात्रय खुटाळे, अमोल जगदाळे, रंगनाथ ढवळ, अशोक गायकवाड, हनुमंत कनेरकर, राहुल शेळके सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी नागरिक उपस्थित होते.
यापुढे बोलताना राहुल कुल म्हणाले गावचा विकास करणे, गावातील नगरिकांच्या अडचणी सोडवणे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. सरपंच शिरसाट म्हणाल्या आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विविध योजना, आरोग्य विषय अशी कामे प्राधान्याने केली जात आहेत. गावातील राजकारण बाजूला ठेऊन विकासाला अधिक प्राधान्य पुढील काळात दिले जाईल असा सकारात्मक अशावाद शिरसाठ यांनी व्यक्त केला.