पुणे : राज्यातील महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे भाजपाने महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाघ यांना निवडीचे पत्र दिले.
महाविकास आघाडीच्या त्यांवर टीका करणे असो, त्यांना प्रत्युत्तर देणे असो, तसेच राज्यातील महिलांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्यात अग्रेसर असलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पक्षनेतृत्वाने हि जबाबदारी दिली आहे. त्यांनी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपने चित्रा वाघ यांच्याकडे महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याआधी उमा खापरे यांच्याकडे अध्यक्षपद होते. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या महिलांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडत आहेत. त्यामुळे आता भाजपने वाघ यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उमा खापरे या आमदार झाल्यानंतर पक्षाने महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड केली आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांतील चांगल्या काम करणाऱ्या महिलांना चित्राताईंच्या नेतृत्वाखाली प्रवेश मिळेल, असे ते म्हणाले. चित्रा वाघ यांची निवड सार्थ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.