पुणे : राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत या प्रकरणी भाष्य केले आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले स्वराज्यरक्षक मालिका करत असताना जे जाणवले ते मांडत आहे. इतिहासाचा तर्कशुद्धीने विचार करायला हवा. छत्रपती शंभुराजे यांनीच लिहिलेला ग्रंथ पाहिला तर त्यात त्यांनी धर्माची उत्तम चिकित्सा केली आहे. त्यांनी त्यावर श्लोक रचला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले. धर्मासाठी बलिदान दिले, याचा अभ्यास केला तर याचे काही पुरावे आहे. त्यामध्ये काही इतिहासकारांनी जे काही लिहून ठेवले आहे. असे कोल्हे यांनी म्हटले आहे.
यापुढे बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “जबरदस्तीने ज्यांचे धर्मांतरण झाले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पुन्हा एकदा हिंदू धर्मात शुद्धिकरण करून हिंदू धर्मात स्वागत केले होते. संभाजी महाराजांनी नेहमी हा कित्ता गिरवला. जबरदस्तीने आणलेल्या धर्मातरावर त्यांनी बंदी आणली होती, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले. औरंगजेब बादशाहने शंभुराजेंनी बंदी केल्यानंतर २ प्रश्न विचारले होते. स्वराज्याच्या खजिना कुठे आहे आणि औरंगजेबाची कोणती लोक शंभुराजांना शामिल आहेत. असे चारही इतिहासकार नमूद करतात. धर्मांतर करायला त्यांनी नकार दिला याचा कुठेही आधार नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र हिवाळी अधिवेनावेळी विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असू इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच ‘बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.