पुणे : रिपप्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट ) प्रदेश महिला आघाडीच्या राज्यस्तरीय बैठक सोमवारी (ता.३१) पिंपरीत झाली. रिपप्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
“देशात स्त्रियांवर अत्याचार वाढले आहेत. पालकांनी आपल्या तरूण मुलांवर लक्ष द्या. अन्यथा हयगय केली जाणार नाही. गाव तेथे आरपीआय महिला आघाडीची शाखा स्थापन करा. शाखेच्या माध्यमातून महिलांवर होणारा अत्याचार थांबवा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.यावेळी महिला आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आठवले यांच्या हस्ते पदांच्या नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांची आरपीआय महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड केल्याचे आठवले यांनी जाहीर केले.
आठवले म्हणाले, “डॉ. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मातील महिलांसाठी हिंदु कोड बिल कायदा बनवला होता. मात्र तो पास केला नाही, म्हणून त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीणामा दिला होता. आजची स्त्री शिक्षण घेत आहे. आरपीआय महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मदत करणे गरजेचे आहे,”
या कार्यक्रमास पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सिमा आठवले, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता आठवले, केंद्रिय समिती सरचिटणीस अॅड. आशा लांडगे, केंद्रिय समितीच्या सचिव शिला गांगुर्डे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड. अभया सोनवणे आदींसह महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यांमधून महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.