Beed News : परळी, (बीड) : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वक्तव्यामुळे (statement) अनेक वेळा राजकीय वर्तुळात(political circles) चांगलीच चर्चा रंगते. एकदा तर त्यांनी “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री” (Chief Minister) असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि पक्षामध्ये एकच चर्चा रंगली होती. त्यावेळी पंकजांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. मात्र आता त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण्यांसह (Political) जनतेच्या देखील भुवया (eyebrows) उंचावल्या आहेत.
देशाची पंतप्रधान एक स्त्री होती मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का
पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातील परळी जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलत होत्या.
“कार्यकर्त्यांनी खंबीरपणे आपल्या नेत्याच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे असते. देशाची पंतप्रधान एक स्त्री होती मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?” असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. या विधानामुळे पंकजा आता मुख्यमंत्री नव्हे तर थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरल्या की अशी चर्चा रंगली असून राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ”लोकांसाठी झटून काम करणं हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. जे माझ्यात रुजले आहेत त्याच संस्कारावर चालणारी ही तुमची ताई आहे. ताईंमध्ये काही खोटं असेल तर तुम्ही उघडपणे सांगू शकता.” असेही त्यांनी यावेळी सांगितले. थेट पंतप्रधानपदी वक्तव्य केल्याने भाजप आणि विरोध काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Politics News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यातील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता ??