पुणे : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सुरु झाला आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. मंगळवारी (ता. ०९) आमदार शपथ घेणार आहेत. शिंदे – फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा राजभवनात सकाळी ११ वाजता शपथविधी सुरुवात झाली. यामध्ये भाजपा व शिंदे गटातील प्रत्येकी ९-९ आमदारांना शपथ देण्यात आली आहे.
भाजपाचे ९ मंत्री पुढीलप्रमाणे –
चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुड मतदारसंघाचे आमदार, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार, राधाकृष्ण विखे पाटील १९९५ पासून नगरमधील शिर्डी विधानसभेचे आमदार, संजय कुटे बुलढाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे चार टर्म आमदार, गिरीश महाजन जळगावमधील जामनेर मतदारसंघाचे आमदार, रवींद्र चव्हाण २००९ पासून डोंबिवली मतदारसंघाचे भाजप आमदार, मंगलप्रभात लोढा भाजप आमदार मंगल प्रभात लोढा मलबार हिल मतदारसंघातून विजयी, अतुल मोरेश्वर सावे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी, विजयकुमार गावित नंदुरबारमधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.
शिंदे गटाचे ९ मंत्री पुढीलप्रमाणे –
उदय सामंत रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार, गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार, दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार, अब्दुल सत्तार संभाजीनगरमधील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार, दादाजी भुसे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (बाह्य) मतदारसंघाचे आमदार, तानाजी सावंत धाराशिवमधील भूम परांडा मतदारसंघाचे आमदार, शंभूराज देसाई सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार, संदीपान भुमरे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचे आमदार, संजय शिरसाठ संभाजीनगर पश्चिमचे शिवसेना आमदार,