Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एकाची साडेचार कोटींची फसवणूक ; सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 9 August 2022, 12:16

पुणे : शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला २४ टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाने दुसर्‍या व्यावसायिकाला तब्बल ४ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा प्रकार १५ जुलै २०२० ते ७ जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे.

अभिजित अप्पासाहेब वठार (वय ४०, रा. ओकवड्स हिल सोसायटी, बाणेर) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिजित धोंडीबा सावंत (वय ४०, रा. सनसिटी रोड, सिंहगड) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित वठार याला ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत तिघांनी वठारविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत ब्रोकरेजचा व्यवसाय करतात. त्यांची ट्रेडबिझ इंडिया एलएलपी नावाची कंपनी आहे. सावंत यांचे ऑफिस असलेल्या इमारतीत वठारचे देखील कार्यालय आहे. वठार हा एच. आर. एंटरप्राईजेस, फॉरेक्स ट्रेडिंग, शेअर ट्रेडिंग आणि रिरायझिंग कन्स्ट्रक्शन या कंपन्यांत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करीत होता. त्यानुसार २०२० मध्ये संग्राम घाडगे या मित्राने सावंत यांना वठारबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो. याबाबत माहिती देऊन असंख्य लोकांनी कोट्यवधी रुपये त्याच्याकडे गुंतविल्याचे त्यांना सांगितले. सावंत यांना विश्वास वाटावा म्हणून काही बँकेचे व्यवहारसुद्धा दाखवले.

जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा जास्त नफा, असे वठारने सूत्र सांगितले. सावंत यांनी प्रलोभनाला बळी पडून वेळोवेळी १ कोटी ७० लाख रुपये ऑनलाईन त्याच्या हवाली केले. त्यानंतर काही दिवसांनी ५० लाख रुपये सावंत यांच्या खात्यावर जमा केले. हा नफा असल्याचे सांगून मूळ रक्कम आपल्याकडे शिल्लक असल्याचे सांगितले. त्यामुळे सावंत आणखी त्याच्या जाळ्यात अडकत गेले. रोख व कंपनीच्या खात्यातून सावंत यांनी वठार याला ४ कोटी ८८ लाख रुपये दिले. मात्र, ठरल्यानुसार पैसे न देता वठारने परत सावंत यांना गुंतवणूक केलेले पैसे व नफा असा ५ कोटी रुपयांचा कंपनीच्या नावे कोल्हापूर येथील कार्यालयात १७ डिसेंबर २०२० मध्ये गुंतवणूक करारनामा करून दिला.

 

सावंत यांना विश्वास वाटावा म्हणून वठारने तारखेच्या अगोदरच दिलेला पाच कोटी रुपयांचा चेक बँकेत वटवण्यासाठी टाकू नका, कारण कंपनीचे पैसे दुसर्‍या व्यवसायात अडकल्याचे सांगत होता. सावंत यांनी एकेदिवशी त्याने दिलेले सर्व चेक बँकेत जमा केले. मात्र, खात्यावर पैसे नसल्यामुळे सर्व चेक बाऊन्स झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावंत यांनी वठारसोबत संपर्क केला असता, त्याने तो विदेशात असल्याचे सांगून वेळ मारून नेत होता. मात्र, सावंत यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला असता वठारने ‘मी तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकविल,’ असे सांगितले. सावंत यांनी वेळोवेळी रोख व कंपनीच्या खात्यातून वठारकडे गुंतविलेल्या पैशातून ६२ लाख २५ हजार रुपये परत देऊन ४ कोटी ३७ लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी वठारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, वठारविरुद्ध यापूर्वी चतुःशृंगी व अंबाजोगाई पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने दहा ते पंधरा लोकांची अशाप्रकारे फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी गुन्हे शाखेशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44
Next Post

परंड्यातील चांदणी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp