Breaking News : मुंबई : पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांना व्हीप लागू केला आहे. त्यामुळे पहिल्याचं दिवशी विधानभवनात राष्ट्रवादीतील दोन गटांत संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, काल राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचा एक गट सोडून गेल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. दोन्ही गटाने राष्ट्रवादी पक्ष आमचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत संघर्ष होणार आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांना व्हीप लागू केला आहे. राष्ट्रवादीच्या एका गटाची व्यवस्था विरोधी पक्षात करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. (Breaking News) काल राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या गटाने शरद पवारांची भेट घेतल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चा सुरु झाली होती. मात्र, विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदारांना व्हीप बजाविण्याचे काम मी करत आहे. (Breaking News) पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या आमदारांना व्हीप बजावले जातील. पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्हीप बजावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व्हीप नाकारला तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर हे पहिलेच पावसाळी अधिवेशन आहे. (Breaking News) या अधिवेशनात कोणत्या घोषणा होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News! शाळेची शनिवारची वेळ आता कमी होणार…