Breaking News : मुंबई : तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकीपूर्वी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. हे सगळं घडत असताना गृहमंत्री काय करत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे पुरावेही लवकरच सादर करणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. या गंभीर आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
पुरावेही लवकरच सादर करणार
तुरुंगात असलेले कैदी लपून-छपून मोबाईलचा वापर करत आहेत. सध्या सरकारमध्ये सहभागी असलेले काहीजण मुंबईपासून नाशिकपर्यंतच्या तुरुंगातील कैद्यांशी संवाद साधत आहेत.(Breaking News) भयानक गुन्हे केलेल्या कैद्यांना जामीन देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबतचे सर्व पुरावे मी लवकरच देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जे काही भयंकर सुरू आहे, ते मी लवकरच बाहेर काढणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना या कृत्यांची माहिती असली पाहिजे, गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
अंडरवर्ल्डची टोळी मुख्यमंत्री कार्यालयात बसली आहे. तुरुंगाच्या दारात कैद्यांची भेट घेतली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष ठेवा, असा इशारा त्यांनी दिला. (Breaking News) तुम्ही घटनात्मक पदावर आहात मिस्टर फडणवीस. आमचं काय वाकडं करायचं ते करा. पण हिंमत असेल तर आमनेसामने लढा, असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं.
दरम्यान, सध्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून त्यांनी महायुतीवर कडाडून टीका केली. राऊत म्हणाले की, महायुतीमध्ये पदावरून टोळीयुद्ध सुरू आहे. (Breaking News) प्रत्येकजण पदासाठी आपापसात लढत आहे. उद्या अंगावर हात टाकायलाही हे मागेपुढे पाहणार नाहीत. अजित पवार आल्यावर त्यांचे अस्तित्व संपले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : ‘त्या’ १२ आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Breaking News : पुण्यातील नऱ्हे येथील भूमकर चौकाजवळ कोळशाच्या ट्रकचा टायर फुटल्याने पलटी