Breaking News : नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. यातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अजित पवार यांचं बंड दिवाळीनंतर होणार होतं. भाजप हायकमांड आणि संघाकडून दिवाळीनंतर अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, निवडणुकीला केवळ वर्ष बाकी असताना अजितपवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. हे एवढ्या घाई-गडबडीत का झाले, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात होता. आता अजित पवार यांच्या बंडाचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.
अजित पवार यांचे बंड महाविकास आघाडीला रोखण्यासाठी?
अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी हातमिळवणी करणार हे पूर्वीच ठरलं होतं. मात्र, दरम्यानच्या काळात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. (Breaking News) महाविकास आघाडीच्या राज्यात वज्रमूठ सभा सुरू होत्या. या सभांना जनतेतून सहानुभूती मिळत होती. या सभा केवळ गर्दी खेचत नव्हत्या तर त्याची चर्चाही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सुरू झाली होती. यामुळे अजित पवार यांना वेळेआधीच बंड करण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत गेलेला बंडखोर आमदारांचा गट सलग दोन दिवस शरद पवार यांना भेटून, चर्चा केली. आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्हीच आमचे नेते आहात, अशी विनवणी करण्यात आली.(Breaking News) या घटनेची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. यामागील कारण देखील आता उघड झाले आहे. शरद पवार यांची माफी मागणं किंवा राष्ट्रवादीतील फुटीचा तिढा सोडवणं हा या भेटीचा उद्देश नसल्याचं आता समोर आलं आहे.
अजित पवार यांना बंडखोरी करायला सांगण्यामागे शरद पवार यांना देखील एनडीएमध्ये आणण्याचा प्लान असल्याचेही यानिमित्ताने उघड झाले आहे. (Breaking News) शरद पवार यांनी बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीला न जाता, दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहावे म्हणून त्यांना आग्रह करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट शरद पवार यांना भेटायला गेला होता, अशी धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे.
पवार यांना एनडीएच्या बैठकीला आणण्याचे अजित पवार गटाचे नियेजन होते. त्यामुळेच शरद पवार यांची दोन दिवस मनधरणी करण्यात आली.(Breaking News) शरद पवार यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता. पण शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी एनडीएच्या बैठकीला जाण्यास नकार दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.