Breaking News : पुणे : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह हे शनिवारी रात्री पुण्यात दाखल झाले. ते आज पिंपरी-चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात होणाऱ्या सहकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. या वेळी ते बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा होता. शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. दोन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात फक्त सहकार विभागाकडून आयोजित एक कार्यक्रम होता. त्यानंतर त्यांचा इतर वेळ राखीव ठेवला होता. परंतु आता त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल केला गेला आहे. आता अमित शाह कार्यक्रमानंतर तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय अधांतरीच राहणार?
अमित शहा फक्त सहकार विभागाचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमधील हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा वेळ राखीव होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. (Breaking News ) त्याठिकाणी बैठका होणार होत्या. त्या बैठका अमित शह यांनी रद्द केल्या आहेत. आता अमित शहा ३ वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सहकार विभागाचा कार्यक्रम संपवून अमित शाह डब्ल्यू मेरियट हॉटेलला येणार होते. त्याठिकाणी बैठकांचे आयोजन केले होते. (Breaking News ) परंतु कार्यक्रम झाल्यानंतर अमित शाह तातडीने दिल्लीला जाणार आहेत. यामुळे या बैठका सकाळी ११ वाजताच सुरु झाल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अमित शाह यांना भेटण्यासाठी डब्ल्यू मेरियट हॉटेलला दाखल झाले आहेत. (Breaking News ) या चारही नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे. या बैठकांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच राज्यात भाजपच्या मिशन ४५ यासंदर्भात रणनिती बैठकीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : अमित शहा यांच्या पिंपरी दौऱ्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटिसा; काही नजरकैदेत!