Breaking News : बीड : भाजपमध्ये पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय व्यासपीठावर सतत होत होती. मागच्या महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मी भाजपची आहे; पण भाजप माझी थोडीच आहे… असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं होतं.
मोठी घोषणा करणार का?
त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये धनंजय मुंडे यांचा देखील समावेश आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. (Breaking News) अखेर आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहोत, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे काय भूमिका घेणार? मोठी घोषणा करणार का, हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. (Breaking News) पंकजा मुंडे यांनी दोन वेळा दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजच्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : शिरूरचे आमदार अशोक पवार “साहेबांच्या” सोबतच..