Breaking News : नगर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर आता ‘अहिल्यानगर’ करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Breaking News)
चौंढी येथील कार्यक्रमात बोलताना केली घोषणा
चौंडी (ता. जामखेड) येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली आहे. (Breaking News ) यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राम शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दर्शवला आहे. आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच, (Breaking News ) असं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सागितलं आहे.
त्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अहिल्यानगर नामांतरावर भाष्य करत करत अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार असल्याचं जाहीर केलं आहे. (Breaking News ) यावरुन राज्य सरकारकडूनही अहिल्यानगर नामांतराला मंजुरी मिळणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव अहिल्यानगर नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शासन दरबारी केली होती.(Breaking News ) त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांकडूनही शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत होता. एवढंच नाहीतर अहमदनगरचे नाव अहिल्यानगर व्हावे यासाठी यात्राही काढण्यात आली होती.
अखेर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीदिनीच आमदार राम शिंदे यांनी मागणी केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरच्या नामांतरावर शिक्कामोर्तब केलं आहे. (Breaking News ) अहमदनगरच नामांतर अहिल्यानगर होणारच, असं ठामपणे फडणवीसांसह एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :