Breaking News : नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. देशात मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पुढच्याच वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहेत. तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणूका होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचालींना वेग आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारीला सुरुवात
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप्रणित एनडीए सरकारला पायउतार करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. या विरोधी पक्षांच्या आघाडीचे इंडिया असे नामकरण करण्यात आले आहे. पडद्यामागे देखील महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. (Breaking News) त्यातच महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. दोन प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील या राजकीय घडामोडींनंतर जनता कुणाच्या बाजूने कौल देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जाणार? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. अनेक महापालिकांची मुदत तीन वर्षांपासून संपलेली आहे. पण अद्यापही निवडणुका झालेल्या नाहीत. (Breaking News) कोरोना संकटामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पण नंतर या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. असं असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. (Breaking News) अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी २८ जुलैला पुण्यात शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आले आहे. मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घटना घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मोठी बातमी! अंधेरीत सोसायटीवर कोसळली दरड; झोपेत असतानाच प्रचंड आवाज झाला अन्…
Big Breaking News : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली, दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम