Breaking News : मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, या बैठकीमध्ये किती आमदारांनी नोटीसला उत्तर दिले आणि किती आमदारांनी मुदतवाढ मागितली याचा आढावा घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Breaking News) लवकरच या आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष
एकनाथ शिंदे यांनी एक वर्षापूर्वी शिवसेनेत बंड केलं होतं. या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी यांनी १६ आमदारांना अपात्र केलं होतं. त्याविरोधात शिवसेनेने ( ठाकरे गट) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र, अद्यापही विधानसभा अध्यक्षांनी यावर निकाल दिला नाही. (Breaking News) याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सांगितले की, निर्धारित वेळत याचा निर्णय द्यावा. लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही. संवैधानिक आणि नियमांचे पालन करून अपात्रतेबाबत आम्ही निर्णय देऊ, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात निकाल देताना, आमदारांच्या अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी बैठक बोलावली आहे. (Breaking News) या बैठकीमध्ये किती आमदारांनी नोटीसला उत्तर दिलं आणि किती आमदारांनी मुदतवाढ मागितली याचा आढावा घेतला जाणार आहे. लवकरच आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येण्याची देखील शक्यता आहे.
शिवसेनेच्या मूळ घटनेचा अभ्यास करून या प्रकरणावर निर्णय घेतला जाईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली. निवडणूक आयोगाकडून घटनेची प्रत मिळताच त्यांनी कारवाईला सुरुवात केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली, दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम