Breaking News : मुंबई : आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पूर्वनियोजित भेट आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे. मात्र, भेटीमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीतून नेमके काय निष्पन्न होणार, याची चर्चा सुरू
दरम्यान, नुकताच राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. (Breaking News ) या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीतून नेमके काय निष्पन्न होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी ‘या चिमन्यांनो परत फिरा’ असं म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली होती. (Breaking News ) त्यामुळे शिंदे गट पुन्हा ठाकरे गटासोबत जाणार का? त्यांचं नेतृत्व दोन्ही ठाकरे बंधू करतील का? ते पाहणं महत्त्वाचं होतं. असं असताना आज राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या रणरागिणी निलम गोऱ्हे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. (Breaking News ) त्याआधी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटून एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर पुढे काय घडणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले…