Breaking News : मुंबई : आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही बंडखोरी झाल्याने हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी कालच शरद पवार यांची भेट घेतली होती. तासभर ही बैठक चालली होती. आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत. यावेळी पवार या आमदारांशी संवाद साधणार असून, या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार थोड्याच वेळात आमदारांशी संवाद साधणार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कालच अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी सर्व बंडखोर मंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले होते. आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरवर आले आहेत. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, (Breaking News) अनिल पाटील आणि इतर आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. शरद पवार हे सिल्व्हर ओकवर आहेत. तिथून ते वायबी चव्हाण सेंटरला निघाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड हे चव्हाण सेंटरला पोहोचत आहेत. जयंत पाटीलही चव्हाण सेंटरकडे यायला निघाले असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. आजची भेट नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. काल शरद पवार यांनी मंत्र्यांशी संवाद साधला नव्हता. असं असतानाही आज आमदार पवारांच्या भेटीला आले. (Breaking News) तसेच शरद पवार हे सुद्धा घरातून चव्हाण सेंटरकडे निघाले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदार आणि शरद पवार यांच्यात काही तरी खिचडी शिजत असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, सर्व आमदार आणि मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन गुंता सोडवण्याची विनंती करणार आहेत. त्यामुळे शरद पवार बॅकफूटवर जाणार का? राष्ट्रवादीत पुन्हा समेट होणार का? शरद पवार भाजपसोबत जाणार का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Breaking News) थोड्याच वेळात याची उत्तरे मिळणार आहेत.
दरम्यान, आजच्या अधिवेशनालाही राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी दांडी मारल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एकूण आमदार ५३ आहेत. यातील नवाब मलिक तुरुंगात असल्यामुळे सध्या ५२ आमदार उपलब्ध आहेत. त्यापैकी अजित पवार गटाचे १५ उपस्थित होते, (Breaking News) तर शरद पवार गटाचे ९ आमदार सभागृहात उपस्थित होते. राष्ट्रवादीचे एकूण २८ आमदार अनुपस्थित राहिले. याचे कारण उलगडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हेंची आमदारकी अडचणीत? ठाकरे गट आक्रमक
Breaking News : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांना व्हीप; काय म्हणाले अनिल पाटील?