Breaking News : मुंबई : महाराष्ट्रात आज राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ४० सहकारी आमदारांसोबत भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी करत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ, दिलीप वळेस पाटील, प्रफुल्ल पटेल यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. हे तिन्ही नेते शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात.
शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल यापुढे कशी होईल, हे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबत का नाही जाऊ शकत?
* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. (Breaking News) आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबत का नाही जाऊ शकत, असे सांगत अजित पवार यांनी बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे, असे सांगितले. राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे, असंही अजित पवार म्हणाले.
* लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असते. ही आजपर्यंतची परंपरा आहे.(Breaking News) नवीन नेतृत्व पुढे आलं पाहिजे, यासाठी माझे हे बंड आहे. माझ्यासोबत पक्षातील बहुसंख्य आमदार आहेत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
* नागालँडला झालेल्या निवडणुकीत पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. सातही जणांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला योग्य खाती मिळतील. आम्ही सर्वस्व पणाला लावणार आणि पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार.
* राज्य आणि देश पातळीवरील निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार आहोत. जिल्हा पातळीवर स्थानिक निवडणुकीत जिल्हास्तरीय नेते निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.
* अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला असून, शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. (Breaking News) आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरच लढवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सगळ्यांचा आशिर्वाद मिळावा, असे आवाहन देखील केले.
दरम्यान, मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या बंडाला फाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील जे डबल इंजिनचं सरकार आहे, त्याला आता ट्रिपल इंजिन जोडलं आहे. आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.