पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा आज (दि.१०) दिला. पक्ष, संघटना आणि सरकारमधील जबाबदाऱ्यांना अधिक वेळ देता येईल, यासाठी अजित पवार यांनी हा राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार हे गेली 32 वर्षे या बँकेचे संचालक होते. पण आता त्यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांची नुकतीच पुण्याच्या पालकमंत्रिपदावर वर्णी लागली आहे. ज्यावेळी अजित पवार बँकेच्या संचालकपदावर आले, त्यावेळी बँकेचा व्यवसाय 558 कोटी होता.
आजच्या घडीला 20 हजार 714 कोटी व्यवसाय बँकेचा असून, हे केवळ अजित पवार यांच्या कुशल नेतृत्वामुळे शक्य असल्याचे बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
तदरम्यान, संचालकपदाचा राजीनामा दिला असला, तरी ते बँकेला मार्गदर्शन करणार असल्याचेही दिगंबर दुर्गाडे यांनी म्हटले आहे.