Breaking News : मुंबई : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथविधी घेऊन ११ दिवस उलटले तरीही खातेवाटप रखडले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या याबाबत बैठका सुरु होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, खातेवाटपाचा तिढा सुटता सुटताना दिसत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. आता भाजपच्या दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ नेत्यांसमोर याविषयी सखोल चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आता दिल्लीतच खलबतं होण्याची शक्यता आहे.
अजित पवार दिल्लीला रवाना; शिंदे, फ़डणवीसही निघाले
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस काही खात्यांसाठी आग्रही आहे. पण शिवसेनेच्या आमदारांचा त्याला विरोध आहे. अजित पवार अर्थखाते मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. (Breaking News) मात्र, अजित पवार यांनी यापूर्वी अर्थखात्याचा कार्यभार साभाळला होता. त्यावेळी त्यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव केला गेला होता, असा आरोप शिवसेना आमदारांनी केला आहे. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी देखील राष्ट्रवादी आग्रही असल्याचे समजते. या पदावर शिवसेनाचाही डोळा आहे. त्यामुळे आता हा वाद भाजपच्या दिल्लीदरबारी गेला आहे.
दरम्यान, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेची असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Breaking News) अजित पवार दिल्लीला रवाना झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना होणार आहेत. आता तिढा सोडविण्यात अमित शाह यांना यश मिळतं का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. (Breaking News) अनेक आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही पाठवलं आहे. त्यामुळे आता भाजपचे दिल्लीतील हायकमांड काय तोडगा काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढा सुटणार; राजभवनावर हालचालींना वेग; आजच शपथविधी होणार?