हडपसर : हडपसर विधानसभा भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय उर्फ आण्णा तुकाराम सातव (वय-५३, सातवनगर, हडपसर) यांचे आज शुक्रवारी (ता.१३) पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
संजय सातव हे मागील काही दिवसांपासून दीर्घ आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची उपचारादरम्यान आज शुक्रवारी (ता.१३) पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे हडपसर विधानसभा भाजपामध्ये शोककळा पसरली आहे.
संजय सातव यांनी हडपसर विधानसभा भाजपा ओबीसी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी या पदाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या समस्या हाताळून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे.
त्यांच्या निधनामुळे हडपसर विधानसभा भाजपा ओबीसी सेलमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.